*सभासदांची नाराजी ओढावून घेणारच नाही - अभिजीत पाटील* *विठ्ठलच्या निवडणुकीत अभिजीत पाटील गटामध्ये प्रवेशाचे सत्र सुरूच*
*सभासदांची नाराजी ओढावून घेणारच नाही - अभिजीत पाटील*
*विठ्ठलच्या निवडणुकीत अभिजीत पाटील गटामध्ये प्रवेशाचे सत्र सुरूच
पंढरपूर/, प्रतिनिधी
श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण सभासदांच्या हितासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असून, आपली सेवा करण्याची संधी जर आम्हाला दिली तर कोणत्याही सभासदांची नाराजी ओढावून घेण्याचा प्रसंग मी येवू देणार नाही अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने अभिजीत पाटील यांनी गट निहाय विचार विनिमय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरूवारी उपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी अभिजीत पाटील पुढे बोलताना म्हणाले, कारखान्याची लढाई ही विचारांची लढाई आहे. ती विकासाने बोलली पाहिजे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करून सभासदांची मने जिंकण्याचा कुणी प्रयत्न करून नये. विकासाचे धोरण मी सभासदांपुढे मांडत आहे. सभासदांचा कल माझ्याकडे आहे. सभासदांनी उपरी या गावामध्ये दिलेल्या प्रतिसादामधून विजयाचा हा कल मला स्पष्ट दिसत आहे. कारखान्यात फक्त शेतकरी सभासद, कामगार हितालाच प्राधान्य असेल. कारखाना सुरू झाल्यावर पहिला हफ्ता हा 2500 रुपयांचा असेल असेही आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे. यामध्ये उपरीचे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पाटील गटात केला जाहीर प्रवेश केला. मगरवाडी येथील मा.ग्रा.प सदस्य जालिंदर नकाते, हनमंत जगदाळे, युवा नेते हनुमंत हिंगे तसेच सुपली येथील शिवाजी सोपान माळी, मोहन माळी, सुखदेव विठोबा यलमार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब लाडे, मा.उपसरपंच शिवाजी ज्ञानोबा यलमार, मा.सरपंच भारत दामू लाडे, अरुण घाटूळे, दिपक यलमार, सुरेश दशरथ घाटूळे, कांतीलाल रामहारि यलमार, अनिल यलमार, शामराव यलमार, आनंदा माळी, मा सरपंच, औदुंबर सुदाम लाडे, अनिल यलमार, दीपक यलमार, वाडीकुरोली येथील संजय नामदेव काळे, तावशी ग्रा. सदस्य शिवाजी कृष्णात शिंदे, धोंडेवाडी येथील रघुनाथ धर्मा देठे, उमेश देठे, चेअरमन सुनील ताठे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने अभिजीत पाटील गटाची ताकद वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला मोठे खिंडार पडल्याचे दिसुन येत आहे.
यावेळी अभिजित पाटील यांच्या अनेक समर्थक यांनी सत्ताधारी संचालकमंडळाच्या कारभारावर टीका करत भाषणे केली.