*करकंब नगरपंचायतीचा मार्ग सुकर..*

करकंब /प्रतिनीधी
राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला मुदत संपलेल्या व नवनिर्वाचित नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात आणि नगरपंचायतीच्या निवडणूका होणार असल्यामुळे बहुचर्चित असलेला करकंब व टेंभूर्णी या नगरपंचायतचा प्रस्तावही शासन दरबारी पडलेला आहे असे असताना करकंब नगरपंचायत कधी होणार याकडे करकंबकरांचे लक्ष लागून लागले आहे. परंतु आता मात्र राज्य निवडणूक आयोगाने करकंब व नातेपुते या गावचा कच्चा आराखडा तयार करुन प्रारुप प्रभाग रचना आराखडा तयार करताना सन 2011 ची जनगणना विचारात घेण्यात यावी असे प्रशासनाला कळविले असल्याने करकंब नगरपंचायतीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून करकंब नगरपंचायतीसाठी पाठपुरावा सुरु असून सन 2011 ची करकंबची जनगणनेतील लोकसंख्या 17400 असून दिनांक 25/02/2021 रोजी नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना सोलापूर जिल्ह्यातील करकंब ग्रा.पं.ची नगरपंचायतीत रुपांतर करणेबाबत पत्र दिले होते. त्यामध्ये काही त्रुटीची पुर्तता करुन देण्याची आवश्यकता होती. परंतु आजतागायतपणे त्या त्रुटी पुर्ण झाल्या नाहीत. आता मात्र नगरपंचायतीचा मार्ग सुकर होत असला तरी जनआंदोलन, आमरण उपोषण याद्वारे जनजागृती करुन नगरपंचायत करण्याचा मानस नागरिकांमधून केला जात आहे.