*शिव मल्हार न्यूज इफेक्ट* *अखेर ... करकंब चौक ते मोडलिंब चौक ते नवरानवरी पर्यंत रस्त्याच्या कामास सुरुवात....!*

 *शिव मल्हार न्यूज इफेक्ट*   *अखेर ... करकंब चौक ते मोडलिंब चौक ते नवरानवरी पर्यंत रस्त्याच्या कामास सुरुवात....!*

करकंब /प्रतिनिधी
 गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला मंजूर असलेला करकंब चौक ते मोडनिंब चौक ते नवरा नवरी पर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा व खराब झाल्याने या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक जणांना अपघाताला सामोरे जावे लागले. या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू झाली होती. मात्र ठेकेदार व संबंधित बांधकाम विभाग यांना या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी लवकर जाग येत नव्हती. या रस्त्या संदर्भात शिव मल्हार न्यूज माध्यमातून  या रस्त्याची मालिका चालू ठेवल्यामुळे अखेर करकंब चौक ते मोडनिंब चौक नवरा नवरी पर्यंत च्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या असंख्य वाहनधारकांना ग्रामस्थांना तसेच शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आता दिलासा मिळणार आहे.
    सदरचे काम हे करकंब चौक ते मोडनिंब चौक ते नवरा नवरी पर्यंत पूर्ण करण्याचे असून या कामाकडे वाहनधारकाने विशेषता ग्रामस्थांनी लक्ष देऊन हे काम निकृष्ट दर्जाचे न होता चांगल्या पद्धतीची कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही बोलले जात आहे. सामाजिक शैक्षणिक राजकीय व इतर घडामोडीतून अखेर शिवमल्हार न्यूज च्या माध्यमातून या रस्त्याचे काम आता मार्गी लागले आहे.