*राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप...*

*राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप...*


पंढरपूर/ प्रतिनिधी

कोकणात अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापार व उद्योग विभागाच्यावतीने जीवनावर जीवनावश्यक वाटप करण्यात आले.

 नुकत्याच कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना उघड्यावर राहावे लागत आहे डोक्यावरील छञ वाहून गेल्याने अनेक लोक बेघर झाले आहेत लोकांना खायची भानत झाली असून त्यांना आपला संसार सावरण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होती अडचणीतील गरजवंत पूरग्रस्तांना आपापल्या परीने मदत करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार सेलचे राज्याचे प्रमुख मा.नागेश फाटे यांच्या वतीने आमदार शेखर निकम व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॅा.नरेंद्र काळे यांच्या हस्ते चटई ,ब्लॅंकेट ,साड्या, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले चिपळून येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंतराव खताते शहराध्यक्ष मिलिंद कापडे उपशहर अध्यक्ष खालिद दाभोळकर संजय पडूळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते