*करकंब स्मशानभूमी ला मायेच्या स्वच्छतेचे लागले हात..... आता गावही स्वच्छतेसाठी पुढाकार घेईल जोरात......!** **करकंब च्या युवती महिला व लेकीचे झाड यांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता अभियान** : *"कै. पुष्पा नारायण दुधाने यांच्या स्मृती पिद्यार्थ स्वच्छता अभियानाची सुरुवात.**

*करकंब स्मशानभूमी ला मायेच्या स्वच्छतेचे लागले हात..... आता गावही स्वच्छतेसाठी पुढाकार घेईल जोरात......!** **करकंब च्या युवती महिला व लेकीचे झाड यांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता अभियान** : *"कै. पुष्पा नारायण दुधाने यांच्या स्मृती पिद्यार्थ स्वच्छता अभियानाची सुरुवात.**

 करकंब/ प्रतिनिधी

: करकंब हे पंढरपूर तालुक्याचे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव ,सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर घडामोडी बाबत प्रचंड अग्रेसर असलेला हे गाव... गावचा इतिहास प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले, त्यातच या गावातील आजही असंख्य लोक शिक्षणासाठी काही

व्यवसायासाठी तर काही परदेशात तरी काय देशात वास्तव् करतात. ज्यांना या गावाची ओढ आहे ते लोक आजही अगदी शिपाई पदापासून ते सनदी अधिकारी या पर्यंत असलेल्या अधिकारी सुद्धा या गावाविषयी प्रेम दाखवितात. पण गाव तसं चांगलं...... पण..... या म्हणीप्रमाणे या गावची अवस्था होत असताना गावातील महिला एकत्रित येऊन जे गाव गेल्या अनेक वर्षापासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले .त्यातच जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत असताना अशा स्मशानभूमीत साधे  चालणे सुद्धा मुश्किल असताना अग्नि कसा द्यावा? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असल्याची बाब महिलांच्या लक्षात आल्यानंतरया रणरागिनी एकत्रित येऊन या करकंब स्मशानभूमी ला मायेच्या स्वच्छतेचे हात देऊन ही स्मशानभूमी ची स्वच्छता मायेच्या हाताला भरभरून आशीर्वाद म्हणून तर मकर संक्रांतीच्या औचित्य साधून हे स्वच्छतेचे हाता स्मशान भूमी पासून गल्ली ते गाव करण्याचा संकल्प या रणरागिनी महिलांनी केला

.आठ दिवसातून एकदा ही स्मशानभूमी तसेच प्रत्येक गल्ली जाऊन स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचा संकल्प ही व्यक्त केला. या महिलांच्या स्वच्छता मोहिमेमुळे आता गावही स्वच्छतेसाठी जोरात पुढाकार घेईल. ही स्वच्छता मोहीम कै. पुष्पा नारायण दुधाने यांच्या स्मृति पिद्यार्थ म्हणून या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे प्रणेते ज्ञानेश्वर दुधाने तसेच यावेळी राणी दुधाने वनिता दुधाने देवकी दुधाने साधना टकले वनिता शिंदे संगीता फडके आशा टकले सविता गळीत कर आशा टकले रेवती दुधाने ऋतुजा दुधाने प्रज्ञा दुधाने उषा दुधाने वैशाली चौथे अनुपमा दुधाने पांडुरंग काटवटे नंदलाल कपडे कर अक्षय नगरकर प्रमोद रेडे गणेश पिसे हरिश्चंद्र वास्ते पैलवान बाळासाहेब घाडगे आत्माराम चौरे राजेंद्र टकले गणेश दुधाने विजय जाधव विजय दुधानेअदी उपस्थित होते.