*भावी नगरसेवक प्रसाद(भैय्या ) कळसे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते सत्कार* *आ. समाधानदादा आवताडे प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकाचेही प्रकाशन*

4पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथील युवकांचा बुलंद आवाज , भावी नगरसेवक, आ. समाधानदादा आवताडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रसाद(भैय्या)कळसे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय दमदार आमदार समाधान दादा आवताडे यांनी हार घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठाण या दिनदर्शिका यांचे प्रकाशन आमदार महोदय यांनी केले
मा. प्रसाद भैय्या हे व्यक्तिमत्व नेता नसून एक जनसामान्य जनतेचे सेवक म्हणून परिचित आहेत. युवकांच्या गराड्यात उठ - बस करून विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमातुन तरुणाई च्या क्षमतांना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य मा. भैय्यासाहेब अविरतपणे करत आहेत. त्यांच्या कार्याचा चढता आलेख पाहून आपला माणूस ही बिरूदावली त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्व आणखीच खुलवत आहे असे शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष लखन दादा थिटे,गुरुवर्य शरद चव्हाण सर,मार्गदर्शक भास्कर(तात्या) जगताप,युवा नेते समीर ढाळे,बिरुदेव मासाळ,जनसंपर्क कार्यालय प्रमुख बालम मुलाणी, नवनाथ शिंदे,अभिजित मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.