*करकंब येथील गावठाण मधील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण...!* *सामाजिक कार्यकर्ते विजय मामा माळी यांचा गावठाण रस्त्यासाठी धरला उपोषणाचा मार्ग.*

करकंब /प्रतिनिधी
:-येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मामा माळी यांनी करकंब येथील असलेल्या गावठाण मधील अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्याकडे यापूर्वी निवेदन देऊन उपोषण केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून सदर गावठाणा मधील अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करण्यात आला नाही. सामाजिक कार्यकर्ते विजय मामा माळी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी निवेदन देऊन बुधवार दिनांक 7/11/2022 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.
करकंब येथील गावठाण रस्त्याबाबत दिनांक-22/11/2022 रोजी मागील उपोषणाच्या वेळेचे आदेश पत्र देऊन या कार्यालयाकडून व ग्रामपंचायत कडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या दिनांक-22/11/2022 रोजीच्या पत्रानुसार कार्यवाही झाल्याने दिनांक-7/12/2022 रोजी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना देण्यात आले आहे.