*आ.प्रणिती शिंदे यांनी घेतली राजू खरे यांची भेट* *पंढरपूर ,मोहोळ आणि उत्तर सोलापूर भागात खरे यांची ताकद मोठी*

*आ.प्रणिती शिंदे यांनी घेतली राजू खरे यांची भेट*  *पंढरपूर ,मोहोळ आणि उत्तर सोलापूर भागात खरे यांची ताकद मोठी*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूरचे सुपुत्र उद्योजक राजू खरे यांनी आपली राजकीय ताकत वाढविली आहे सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ , पंढरपूर आणि उत्तर सोलापूर भागात खरे यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी आवर्जून गोपाळपूर येथील  फार्महाऊसवर जाऊन रविवारी दुपारी भेट घेतली आहे. 
    आ. प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर  ग्रामीण भागात गावभेट दौरा सुरू आहे. अशातच त्यांनी राजू खरे गोपाळपूर येथे असल्याची माहिती मिळताच आ. प्रणिती शिंदे यांनी आपल्याला या निवडणुकीत साथ देण्याबाबत विनंती केली आहे. त्यासाठी खरे समर्थक कार्यकर्त्यांनी जवळपास सहमतीही दर्शविली आहे. 
   राजू खरे हे मागील 33वर्षापासून कडवट शिवसैनिक आहेत.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे पर्यायाने महायुतीतील महत्वपूर्ण नेते आहेत. तरीही काँग्रेसचे उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी भेट घेतल्याने खरे यांच्या राजकीय ताकतीला महत्व प्राप्त झाले आहे.
    महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी उमेदवारी मिळताच सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदार आणि नेत्याची
भेट घेतली होती. मात्र शिवसेना नेते आणि मोहोळ विधानसभा मतदार संघावर आपली पकड मजबूत केलेल्या राजू खरे यांना अद्याप भेटले नाहीत. यामुळे खरे समर्थक कार्यकर्त्यामधून नाराजी पसरली होती. याचाच फायदा उठविण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांनी घेतलेली भेट यामुळे खरे समर्थक कार्यकर्त्यांची मानसिकता बदलली आहे.
   या भेटीदरम्यान खरे परिवाराने आ. प्रणिती शिंदे यांचा यथोचित सन्मान करीत जंगी स्वागतही केले आहे. यावेळी तृतीताई राजू खरे यांनी सत्कार केला. यावेळी काँग्रेस ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव,शिवसेना उबाठा गटाचे जयवंत माने, सुधीर  अभंगराव, काँग्रसचे बजरंग बागल, यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, तसेच खरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    
चौकट

*विधानसभेचा  मताचा गठ्ठा कोणाला देणार*?

राजू खरे यांनी मोहोळ विधानसभा निवडणूक जिंकायची यासाठी मागील अनेक वर्ष मोठी साखरपेरणी केली आहे. यामधून विविध प्रकारची मदत हजारो लोकांपर्यंत पोहचली आहे. तर अनेक सार्वजनिक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे खरे यांना मानणारा मताचा मोठा गठ्ठा तयार आहे.हा मताचा गठ्ठा नेमके कोणाच्या पारड्यात टाकणार ? हा प्रश्न मागील काही दिवसात पडला होता. परंतु आ. प्रणिती शिंदे याच मतासाठी भेट घेतली असून, राजू खरे कोणता निर्णय घेणार हे आगामी काळात समजणार आहे.हे मात्र नक्की.