*सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ द्या*  *महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे आवाहन* *औराद येथे महायुतीची जंगी जाहीर सभा*

*सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ द्या*   *महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे आवाहन*  *औराद येथे महायुतीची जंगी जाहीर सभा*

सोलापूर :/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठीची भाजपची सभा औराद येथे झाली.

यावेळी व्यासपीठावर माजी सहकारमंत्री आणि आमदार सुभाष देशमुख, दक्षिण सोलापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, डॉ. चनगोंडा हविनाळे, प्रा. विजयकुमार बिराजदार, भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, अण्णाप्पा बाराचारे, आप्पासाहेब पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, भाजपा युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.

आमदार राम सातपुते म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. श्रीराम मंदिर बांधणाऱ्या आणि श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांमधील निवडणूक आहे. हिंदूंना सन्मान देणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्यांमधील ही निवडणूक आहे. देशाचा वेगाने विकास करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. याची प्रचिती गेल्या १० वर्षात देशवासीयांना आली आहे. त्यामुळेच संपूर्ण भारतभरातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सोलापूरकरांनी यंदाही भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन विकासपुरुष नरेंद्र मोदींचे हात बळकट करावेत, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी केले. अरविंद शेतसंदी यांनी प्रास्ताविक तर आप्पासाहेब मोटे यांनी सूत्रसंचालन केले.
------------
चौकट
तर आमदारकीचा राजीनामा देईन - सुभाष देशमुख

होनमुर्गी गावातील १०० टक्के मतदान काँग्रेसला होणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. होनमुर्गी गावातील मतदार भाजपासोबतच आहेत. त्यामुळे होनमुर्गी गावातील १०० टक्के मतदान काँग्रेसने घेऊन दाखवावे. मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसला दिले.