*संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांचेकडून ढाल तलवार मुख्यमंत्र्यांकडे समर्पित***

*संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांचेकडून ढाल तलवार मुख्यमंत्र्यांकडे समर्पित***

 _

पंढरपूर /प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नांव मिळाले. खऱ्या अर्थाने शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच, यावर शिक्कामोर्तब झाले. या गटाला ढाल, तलवार हे चिन्ह मिळाले. हे चिन्ह शौर्याचे प्रतीक आहे. या ढाल तलवारीची मिरवणूक पंढरपूरमध्ये काढण्यात आली. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात पूजा केलेली ही ढाल तलवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अर्पण करण्यात आली असल्याची माहिती, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी दिली.


शिवसेनेतून दोन शिवसेना निर्माण झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नांव मिळाले. ढाल तलवार हे चिन्ह मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ढालीच्या धाकावर आणि तलवारीच्या टोकावर हिंदूंचे राज्य निर्माण केले होते. याच ढाल तलवारीच्या माध्यमातून यापुढे हिंदवी स्वराज्य निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार चिन्ह मिळताच पंढरीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली, पंढरीतून ढाल तलवारीची मिरवणूक काढण्यात आली. श्री विठ्ठल मंदिरासमोर या ढाल तलवारीची पूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगी संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासोबत
टाकळीचे उपसरपंच संजय साठे, आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवारीचे चिन्ह मिळताच, पंढरीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली, भव्य मिरवणूक काढण्यात आली . ढाल तलवारीचे पूजन श्री विठ्ठल मंदिरासमोर करण्यात आले. हीच ढाल तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्पित करण्यात आली असल्याची माहिती महेश साठे यांनी दिली.