*शिवसेनेच्या महिला दिन कार्यक्रमात महिलांची झुंबड* *साठे बंधूकडून आदर्श महिलांचा सन्मान*
पंढरपूर /प्रतिनिधी
सबंध पंढरपूर तालुक्यात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. चर्चा झाली ती शिवसेनेने राबवलेल्या महिला सन्मान सोहळ्याची. श्रीरामनगर टाकळी रोडवर शिवसेनेकडून महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील 38 महिला या सन्मानास पात्र ठरल्या. या सन्मान सोहळ्यास हजारो महिलांची लाभलेली उपस्थिती ही डोळे दिपवून टाकणारी होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख महेश साठे आणि त्यांचे बंधू उपसरपंच संजय साठे तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा, महिला बालकल्याण विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती ममता शिंदे, विठ्ठल साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे, रुक्मिणी परिवाराच्या संस्थापिका सुनेत्राताई पवार, पंढरपूरच्या मा. नगराध्यक्ष साधनाताई भोसले, डॉ. स्वाती बोधले, विक्रीकर निरीक्षक सारिका साठे, मोटार वाहन निरीक्षक प्रियंका माने, डॉ. गवळी मॅडम, टाकळीच्या सरपंच विजयमाला वाळके इत्यादी मान्यवर महिला भगिनींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात आदर्श राजकारणी मा. सरपंच नूतन रसाळे यांना सन्मानित करण्यात आले. याचप्रमाणे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रवीणा लवटे, अश्विनी गवळी स्वाती मिसाळ, विधीतज्ञ शुभांगी पाटील, ॲड. देशमाने, शिक्षिका मनीषा नगरकर, फराहना कादरी, बेगम तांबोळी, संघटक शुभांगी शिरशीकर अंगणवाडी सेविका नेमाताई शिंदे व इतर , अंगणवाडी मदतनीस विजयाताई देठे, माता माधुरी शिंदे, महिला पोलीस नम्रता डोंगरे, फरीदा देवळे, गृहिणी वनमाला कुंभार, समाजसेविका डिंपल घाडगे, सूत्रसंचालिका रेखा चंद्रराव, रुग्णसेविका सुरेखा कचरे, लोखंडे, देवकर, बचत गट चालक प्रियंकाताई कवडे, काजल खरे, रोहिणी चंदनशिवे आणि इतर, धार्मिक मंडळ प्रमुख शोभा विश्वासे, लांबोरे मॅडम, आशा वर्कर सोनाली मुटकुळे, जयश्री पलसंडे, साधना वाघमारे आणि इतर, मेकअप आर्टिस्ट ज्योती माने, आदर्श पत्नी उषा नागेश कुंभार, कुटुंब प्रमुख राधा भोसले आणि उद्योजिका निर्मला राऊळ यांचा समावेश होता.
*कार्यक्रमस्थळी एकही पुरुष नव्हता*
साठे बंधूंनी राबवलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात एकही पुरुष दिसून येत नव्हता. ग्रामपंचायत सदस्य
रेशमा साठे, रोहिणी साठे. माता नागरबाई साठे सरपंच विजयमाला वाळके यांनीच हा कार्यक्रम मोठ्या जिद्दीने पार पाडला.
*साठे बंधू घराघरात पोहोचले*
समाजकार्याच्या माध्यमातून टाकळी परिसरात साठे बंधूंचा मोठा दबदबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा वारसा घेऊन, साठे बंधू समाजकार्य करत आहेत. यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी पार पाडले आहेत. महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांची दिसून आलेली तोबा गर्दी पाहून , साठे बंधू आता घराघरापर्यंत पोचले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.