*करकंब जिल्हा परिषद गटात युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा.....!**चर्चेमुळे युवा  कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले*.  *दुभंगलेला परिचारक गट एकत्रित येण्यासाठी हाच मार्ग योग्य*?*

*करकंब जिल्हा परिषद गटात युवा नेते प्रणव परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा.....!**चर्चेमुळे युवा  कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले*.   *दुभंगलेला परिचारक गट एकत्रित येण्यासाठी हाच मार्ग योग्य*?*

 करकंब/ प्रतिनिधी

 करकंब जिल्हा परिषद गट पूर्वीपासून कै. श्रीमंत योगी सुधाकरपंत परिचारक, जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत परिचारक यांना मानणारा व पारंपारिक गट आहे .सध्या करकंब जिल्हा परिषद गटात सोशल मीडिया च्या द्वारे व गावागावात युवा नेते प्रणव परिचारक यांची येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये करकंब जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच युवा नेते प्रणव परिचारक यांच्या करकंब जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमधून स्वागत होत आहे.
  माढा विधानसभेच्या माध्यमातून जोडलेल्या पोरका झालेल्या करकंब जिल्हा परिषद मतदार संघासी युवा नेते परिचारक यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंढरपूरची नाळ जोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच दुभंगलेला परिचारक गट पुन्हा एकत्रित येऊन निष्ठावंत पांडुरंग परिवारातील दुर्लक्षित कार्यकर्त्यांना न्याय मिळणार अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. करकंब जिल्हा परिषद गटात करकंब जळवली उंबरे करोळे कान्हापुरी सांगवी बादलकोट नांदोरे पेहे खरातवाडी जाधवाडी बार्डी या गावांचा समावेश आहे. करकंब वगळता परिचारक गटाचे सर्व ठिकाणी पारडे जड असून जर युवा नेते प्रणव परिचारक यांनी करकंब जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केल्यास बिनविरोध निवडून येण्याची शक्यता चर्चिली जात आहे.

 चौकट:

 मी स्वतः निवडणुकीत उभा राहणार आहे . करकंब  हा पूर्वीपासून परिचारक यांचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक जे निर्णय घेतील. त्यास मी निवडणुकीसाठी तयार आहे.
    युवा नेते-प्रणव परिचारक.