*दादा सांगा तुम्ही कोणाचे? पंढरपूर की माढा तालुक्याचे?*

*दादा सांगा तुम्ही कोणाचे? पंढरपूर की माढा तालुक्याचे?*

करकंब/प्रतिनिधी

दादा करकंब मोडनिंब, पंढरपूर करकंब नेमतवाडी चौक, थोरली वेस ते  जळवली चौक, इंदिरानगर झोपडपट्टी बायपास रोड पालखी मार्ग या रस्त्यांची दुरावस्था?
पंढरपूर तालुक्यातील करकब हे सर्वात मोठे गाव ग्रामपंचायत जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण त्यात माळशिरस तालुक्यातील गावांचा या माढा विधानसभा मतदारसंघात समावेश केलेला आहे. करकंब येथे संत एकनाथ संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत गजानन महाराज संत कैकाडी बाबा महाराज शनेश्वर महाराज साई बाबा महाराज आदि मुख्य संतांच्या पालख्या सह लहान मोठ्या दिंड्या मोठ्या संख्येने करकब गावातून व वाडी-वस्तीवर येतात व मुक्कामी असतात. थोरली वेस जळवली चौक पालखी मार्ग, टिळक चौक ते शुक्रवार पेठ गणेश टेकडी पालखी मार्ग (न्यू इंग्लिश स्कूल), न्यू इंग्लिश स्कूल ते नेमतवाडी चौक, इंद्रा नगर झोपडपट्टी बायपास मार्ग, न्यू इंग्लिश स्कूल ते एसटी स्टँड ते शंकर नगर पालखी मार्ग हे सर्व रस्ते पालखी मार्गातील आहेत. हे रस्ते अतिशय खराब झाले असून खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे समजत नाही. या भागातील महिलांना डिलिव्हरी साठी, गरोदर मातांना महिन्याला चेक अप साठी सरकारी व खाजगी दवाखान्यात ये जा करावी लागते. त्यामुळे अतिशय महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. काही महिलांची रस्त्यातच डिलिव्हरी झाल्याची चर्चा आहे. त्याला जबाबदार कोण? लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना पंढरपूर तालुक्यातील व माळशिरस तालुक्यातील गावातील लोकांनी निवडून दिले. याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून हे रस्ते खितपत पडल्याची अवस्था झाली आहे . अनेकांनी आपल्या आपल्या परीने निवेदने तक्रारी दिल्या प्रतिसाद हा प्रतीक्षेत राहिला आहे असे नागरिक म्हणतात की दादा तुम्ही एकदा तुमच्या बाईक वरून या भागातून प्रवास करा जेणेकरून सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या समस्या समजतील. नुसतेच विकास कामाचा शुभारंभ व विकास भूमिपूजन होतात की, काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावर अनेक अपघात घडले, तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत याला जबाबदार कोण? असा सवाल पंढरपूर तालुक्यातील व माळशिरस तालुक्यातील जनता विचारत आहे. तेवढ्यापुरतेच दिखाऊपणा चे काम केले जाते. ना पहिले पाढे पंचावन्न, सांगा दादा तुम्ही कोणाचे? की माढ्याचे असा सूर उमटत आहे.