*करकंब व टेंभुर्णी नगरपंचायती साठी जिल्ह्याचे किंगमेकर शिंदे बंधू करणार का प्रयत्न* ?

करकंब/ प्रतिनिधी -
काही दिवसावर येऊन ठेपलेली विधान परिषदेची निवडणूक त्यातच माळशिरस तालुक्यातील नातेपुते व महाळुंगच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत व अकलूज येथील ग्रामपंचायतीचे नगरपरिषद होण्यासाठी राज्य सरकारने काढलेला अंतिम आदेश यामुळे माळशिरस तालुक्यातील नातेपुते माळशिरस अकलूज या चार नगरपंचायतीचे मिळून एकूण 82 मते वाढल्याने सहाजिकच येणाऱ्या विधानपरिषदेला माळशिरस तालुक्यातुन मोहिते पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार आहे.
एक काळ असा होता की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड होती परंतु मागील काही काळापासून मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे राजकीय हादरे बसले आहेत मागील काही दिवसापूर्वी झालेली पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीला आपला हक्काचा विधानसभा मतदारसंघ गमवावा लागला आहे अशाप्रकारे आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीची धुरा यशस्वीपणे संभाळून राष्ट्रवादीचा हक्काचा असणारा सोलापूर जिल्हा पूर्ण भाजपमय केलेला आहे.
अशातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषद निवडणुकीवर नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषद व नगर पंचायतीच्या माध्यमातून वाढणाऱ्या माळशिरस तालुक्यातील चार नगरपंचायतीच्या माध्यमातून वा डणारा धबधबा राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे तेव्हा माळशिरस च्या वाढणाऱ्या या वर्चस्वाला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी अजित दादा यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्याचे किंगमेकर संजय मामा शिंदे व माढा तालुक्याचे विकास रत्न बबनदादा शिंदे यांना माढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत करकंब व माढा तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून महा विकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेचा परिपूर्ण उपयोग करून लवकरात लवकर करकंब व टेंभुर्णी ह्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर करून माळशिरस तालुक्यातील वाढत्या वर्चस्वाला ब्रेक लावून जिल्ह्यात मरगळलेल्या राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम विधान परिषदे पुर्वी लवकरात लवकर जिल्ह्याचे किंगमेकर आदरणीय संजय मामा शिंदे व माढा तालुक्याचे विकास रत्न आमदार बबनराव शिंदे यांना करावा लागणार आहे.