*करकंब येथे श्री. विरभद्र यात्रा कीर्तन  धार्मिक सामाजिक व विविध उपक्रमांनी संपन्न.* *युवकांच्या जंगी कुस्त्या ने करकंब करांना महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी ची मिळणार नवी दिशा*

*करकंब येथे श्री. विरभद्र यात्रा कीर्तन  धार्मिक सामाजिक व विविध उपक्रमांनी संपन्न.* *युवकांच्या जंगी कुस्त्या ने करकंब करांना महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी ची मिळणार नवी दिशा*


*करकंब/:-करकंब*

येथे विरभद्र यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात भरते.परंतू कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे ही यात्रा खंडीत झाली होती.यावर्षी मोठ्या उत्साहात  ही यात्रा संपन्न झाली.यात्रेत प्रथम दिवशी पालखी मिरवणूक, छबिना मिरवणूक काढण्यात आली.
  परंपरेने रात्री ९वाजता लोकनाट्य तमाशा झाला. शुक्रवारी दुपारी 4वाजता भव्य जंगी कुस्ती मैदान  भरवण्यात आले होते. यावेळी विशेषता करकंब येथील नामशेष होत असलेल्या तालीम पुन्हा एकदा करकंब येथील पूर्वीच्या वस्ताद यांनी लहान वयोगटात पासून ते युवकांपर्यंत कुस्तीची एक नवीन प्रेरणा देऊन यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने जंगी कुस्त्यांचे मैदान जिंकून भविष्यात करकंब येतील हे युवक आता महाराष्ट्र केसरी व हिंद केसरीचा सन्मान करकंब करासाठी सन्मान निश्चित पणाने व आत्मविश्वासाची खात्री बाळगूनच हे युवक मल्ल करकंब करांचे नाव आता राज्यातच नव्हे देशात चमकणार असल्याची चर्चाही यावेळी सुरू होती.
 पंचक्रोशीतील अनेक मल्लांनी येथे हजेरी लावली होती. कुस्तीफड दुपारी चार वाजता सुरू झाले. व रात्री दहाला संपले. शंभर रुपये पासून अकरा हजार पर्यंत कुस्त्या झाल्या. यामध्ये लहान-मोठ्या पैलवानानी आपली कुस्ती सादर  केली. कुस्तीचे समालोचन पंढरपूरचे वस्ताद शिंदे यांनी केले.
कुस्ती फडाचे उद्घाटन उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख ,पंचायत समिती सदस्य राहुल पूरवत,माजी ग्रामपंचायत सदस्य एड. शरद पांढरे, सचिन शिंदे, तुकाराम माने, प्राध्यापक सतीश देशमुख, सतीश माने, उद्योजक
अमोल शेळके यांच्या हस्ते नारळ फोडून  सुरुवात झाली.
 शनिवार दि 19मार्च सायंकाळी 7ते 9या वेळी  नम्रता व्यास यांचे  सुश्राव्य  नारदीय कीर्तन झाले. हर्मोनीयमची साथ माऊली दुधाने यांनी दिली. कीर्तनानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे यांचेवतीनं महाप्रसादाचे वाटप केले. सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम विरभद्र मंदिर देवस्थान कमिटी बनगर गल्ली यांचे वतीने करण्यात आले 
होते.

यात्रा कमिटी बंडू खपाले, पै बाळासाहेब घाडगे, पै करळे, पै रामभाऊ सलगर ,पै सतीश माळी, महादेव  मांजरे ,कुमार वाघमारे, शेटे टेलर, राजू काझी, प्रसन्नजीत हत्तरगे, कमिटी व सर्व करकंब ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे यासाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, राजकीय पदाधिकारी ,व्यापारी सर्वसामान्य नागरिक,  शेतकरी वर्ग यांच्या सहकार्याने यात्रा उत्साहात सुरू झाली.