*पोलीस पाटलांनी दाखवलेल्या तत्परतेने वाहतूक झाली सुरळीत* *रस्त्यात आडवे झालेले झाड बाजूला करीत बजावले कर्तव्य*

*पोलीस पाटलांनी दाखवलेल्या तत्परतेने वाहतूक झाली सुरळीत*  *रस्त्यात आडवे झालेले झाड बाजूला करीत बजावले कर्तव्य*

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील शेळवे ते भंडीशेगाव दरम्यान युवराज गाजरे यांच्या शेती दरम्यान रस्त्यावर एक झाड आडवे झाले होते त्यामुळे वाहतूक कोलमडली होती. ही खबर पोलीस पाटील अँड नवनाथ पाटील यांना समजताच, तत्काळ जावून काही ग्रामस्थांच्या मदतीने हे रहदारीशी येणारे झाड बाजूला सारून तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू झाल्याने, या भागातील नागरिकांनी नवनाथ पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

 दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामध्ये शेळवे भंडीशेगाव रोडवरील ओढ्याजवळ युवराज गाजरे यांच्या शेतातील एक झाड रस्त्यावरती कोसळले होते. त्यावेळी त्या रस्त्यावर वाहतुकीस अडचण निर्माण झालेली होती .युवराज गाजरे यांनी शेळवे गावचे शेळवे पोलीस पाटील नवनाथ पाटील यांना फोनद्वारे ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नवनाथ पाटील यांनी तातडीने त्या ठिकाणाला भेट दिली व त्यानंतर युवराज गाजरे  इक्बाल शेख, सागर विटेकर ,सलीम शेख, व इतर सहकार्याच्या मदतीने त्या झाडाच्या फांद्या कापून तेथील त्या रस्त्यावरील वाहतूक  सुरळीत केली. त्यावेळी शेळवे परिसरातील नागरिकांनी नवनाथ पाटील व युवराज गाजरे व इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.