*आ.समाधान आवताडे स्वतः ट्रॅक्टर चालवून पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर*; *नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करण्याचे दिले आदेश*

मंगळवेढा :/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आ. समाधान आवताडे यांनी रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, आसबेवाडी, शिवनगी, बोराळे, तामदर्डी, तांडोर, रहाटेवाडी,सिद्धापूर,माचनूर, ब्रह्मपुरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा देत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ. आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिले.
गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून मातीचे बांध, रस्ते वाहून गेले आहेत. खरीप पिके, फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मका, कांदा, तुर,सूर्यफूल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमुग, उडीद, दोडका, द्राक्षे डाळिंब या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
या संकटाशी सामना करण्याचे बळ बळीराजाला देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी स्वतः बोराळे येथे ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन परिस्थिती जाणून घेत नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी आमदार आवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एक ही शेतकरी पंचनामा करण्यावाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये असे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी बी. आर माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे, एम एस ई बी चे शाखा अभियंता कांबळे,प्रदीप खांडेकर, दिलीप चव्हाण, पांडुरंग कांबळे, आकाश डांगे, विठ्ठल सलगर ,रावसाहेब कांबळे, अर्जुन मल्लाळे, श्याम आसबे, गणेश गावकरे, प्रमोद म्हमाने, रमेश भांजे ,बापूराया चौगुले ,गंगाधर काकाणकी, विजय भोसले, भीमराव आसबे, ज्ञानेश्वर पुजारी, जगदीश पाटील, गोपाळ पवार, विकास पवार, राजू बाबर, विलास डोके, राजन पाटील, विकास पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोट-
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर शेत शिवारात जाण्यासाठी पावसामुळे कोणतीही व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी आमदार समाधान अवताडे स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्याच्या बांधावर पोचले व तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना धीर देऊन सर्व ठिकाणीचे पंचनामा करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.