*गावची मालमत्ता आणि ठेकेदाराची सत्ता-* *मा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांची प्रतिक्रीया* * भ्रष्टाचारा संबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच इ.डी. कडे सादर करणार *

*गावची मालमत्ता आणि ठेकेदाराची सत्ता-*  *मा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांची प्रतिक्रीया*   * भ्रष्टाचारा संबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच इ.डी. कडे सादर करणार *

करकंब /प्रतिनिधी

ज्या लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलेले आहे हे जनतेची सेवा करण्यासाठी असून ग्रामपंचायत ही गावची मालमत्ता आहे, हे काय ठेकेदारी करण्याचं साधन नाही अशी बोचरी टीका जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी केली.
स्व सुधाकर पंत परिचारक व आ प्रशांतराव परिचारक यांनी गेली१०वर्षे मला करकंब गटाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणारच असे ठाम मत मा जि प  सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख कामकाजामध्ये हस्तक्षेप करीत असल्याबाबत तक्रार दिली त्यावर बोलताना बाळासाहेब देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूकित आमचे आठ सदस्य निवडून आले आहेत. सर्व सदस्य अभ्यासू व जनतेप्रती निष्ठा बाळगणारे आहेत, परंतु त्यांना मागणी करून ही कोणत्याही प्रकारच्या जमा खर्चाची किंवा इतिवृतांची ग्रामसेवकाकडून माहिती दिली जात नाही, 15वा वित्त आयोगाच्या आराखड्याची माहिती दिली जात नाही, लाखो रुपये चा निधी मंजूर करून ही कामे वेळेत केली जात नाहीत, 14 वित्त आयोग व 15 वित्त आयोग नागरी सुविधा दलित वस्ती सुधारणा करण्यासाठी मागील पंचवार्षिक मध्ये सात ते आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे गटाचा नेता म्हणून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्य आहे, ते सत्ताधाऱ्यांना  झोंबत आहे, जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, न्यायासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारच वेळ प्रसंगी उपोषण आंदोलन ही करणार असल्याचे सांगितले.
 जि प स्तर 15वा वित्त आयोगातून करकंबला 20लाख निधी 15मार्च 2021ला मंजुरी दिली, परंतु ग्रामपंचायत काम करण्यास टाळाटाळ करीत आहे .सन2020-21व 2021-22 मध्ये ग्रामपंचायतीला अडीच कोटी चा निधी केवळ 15वा वित्त आयोगातून मिळाले आहेत, त्यातून ठोस असे कोणतेही काम न करता केवळ खडीकरण, मुरुमीकरण केल्याचा नावाने लाखो रुपयांची खोटी बिले काढली आहेत असा आरोपही त्यांनी केला.

चौकट
इतिवृतांची प्रत मिळविण्यासाठी प्रयत्न
ग्रामपंचायतिच्या विरोधी गटाच्या आठ सदस्यांना इतिवृतांची प्रत दिली जात नाही, मागणी करून ही कोणतीही कागदपत्रे दिली जात नाहीत शेवटी उपोषण, माहिती अधिकाराचा वापर करावा लागला, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी केला असल्याने अधिकाऱ्यांवर  ते दबाव आणून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी करकंब ग्रामपंचायत मधील सचिन वाजेला तुरुंगात पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही-माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख.