*पंढरीत क्रांती महिला मंडळाकडून पोलिसांना रक्षाबंधन* *पो. नि. विश्वजीत घोडके यांनी मानले महिलांचे आभार*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरीत विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या क्रांती महिला मंडळाकडून रक्षाबंधन सणानिमित्त पंढरपूर येथील पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. या बांधण्यात आलेल्या राखीने आम्हा पोलिसांना बहिणींचे आशीर्वाद मिळाले असल्याची प्रतिक्रिया देत, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.
येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये पुरुष आणि महिला पोलिसांना राखी बांधून पेढे वाटून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी क्रांती महिला मंडळातील शुभांगी कोठारी, ब्रह्मा कोठारी, सुजाता शहा ,संगीता शहा ,नीलिमा व्होरा, सुनंदा शहा, राणी डोके ,अनुराधा कोठारिया नीलम कोठारी, शुभांगी कोठारी, रंजना अष्टेकर, वंदना कोठारी ,लता शहा, मरवडेकर ,सुनिता व्होरा यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.