*जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥*  *पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु*  

  *जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥*   *पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु*   

पंढरपूर दि. 24: -  आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥  या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला.

             संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज  जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासह अन्य मानाच्या  पालखीचे  गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात आली.

 श्री विठ्ठलाची भेट

            मानाच्या  पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या आणि सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने  पालखी सोहळा प्रमुख, मानकरी आदींचा सत्कार करण्यात आला.आषाढी  वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पुर्ण झाल्यानंतर  जातो  माघारी  पंढरी  नाथा  तुझे दर्शन झाले आता   यानुसार सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.