*डॉ.बी पी  रोंगेसर यांची विठ्ठलच्या निवडणुक रिंगणात यावेळीही उडी* *शेवटच्या दिवशी  सर्व पॅनल चे अर्ज दाखल केल्यामुळेसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खळबळ*

*डॉ.बी पी  रोंगेसर यांची विठ्ठलच्या निवडणुक रिंगणात यावेळीही उडी*  *शेवटच्या दिवशी  सर्व पॅनल चे अर्ज दाखल केल्यामुळेसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खळबळ*

पंढरपूर /प्रतिनिधी

विठ्ठल कारखाना सुरू करणे हेच आपले ध्येय आहे. या ध्येयासाठी हा कारखाना बिनविरोध करावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे असे सांगून डॉ. बी.पी. रोंगे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ उमेदवारी अर्ज दाखल केले, आणि विठ्ठलच्या निवडणूक रिंगणात आपणही आहोत हे दाखवून दिले. डॉ. रोंगे यांच्या या पवित्र्याने विठ्ठलची निवडणूक आणखी दमदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

डॉ. बी.पी. रोंगे हे मोठे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आहे. मागील विठ्ठलच्या निवडणुकीत प्रस्थापितांना निकराची झुंज त्यांनी दिली होती. याचवेळी त्यांनी विठ्ठल कारखाना पुढील काही दिवसात बंद पडणार असल्याची खात्री सभासदांना दिली होती. प्रचंड कर्जामध्ये असलेला हा कारखाना पुढील तीन वर्षात बंद पडला. यावेळी सभासदांना डॉ.बी.पी. रोंगे यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.


विठ्ठलची निवडणूक लागल्यापासून डॉ. रोंगे यांनी निवडणूक बिनविरोध करावी, आणि विठ्ठल कारखाना म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा सुरू करावा, असे आवाहन तालुक्यातील राजकारण्यांना केले होते. परंतु प्रस्थापित संचालक मंडळाने नाही नाही म्हणत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अचानक डॉ.  रोंगे यांनी स्वतःसह पॅनलचे २१ अर्ज दाखल केले. डॉ. बी.पी. रोंगे यांनी सत्ताधारी अन् विरोधकांना दिलेला हा मोठा धक्का आहे, अशी चर्चा सुजान नागरिकांमधून लागली आहे.


चौकट

विठ्ठलच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी डॉ. बी.पी. रोंगे यांनी आपल्या पॅनलचे २१ अर्ज दाखल केले. त्यांच्या या पवित्र्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. रोंगे हे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून मागील विठ्ठलच्या निवडणुकीत उदयास आले आहे. त्यांनी निवडणूक रिंगणात घेतलेली उडी, कोणाची दांडी गुल करणार हे येणारा काळच सांगणार आहे.