*राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर याचे ,पंढरीत  जिल्हा कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे यांनी स्वागत!*

*राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर याचे ,पंढरीत  जिल्हा कार्याध्यक्षा रंजनाताई हजारे यांनी स्वागत!*

पंढरपूर/प्रतिनिधी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांचे पश्चिम महाराष्ट्र परिवार संवाद यात्रे निमित्त सोलापूर जिल्ह्यात विठ्ठल नगरीत पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर महिला जिल्हा कार्याध्यक्ष सौ.रंजनाताई हजारे यांनी सहर्ष स्वागत केले.

        राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील आणि विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत, आज सोमवार आणि उद्या मंगळवारी सोलापुर जिल्यातील सर्वच विधानसभा मतदार संघ निहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
   यासाठी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांचे आगमन पंढरीत झाले असता त्यांचे जिल्ह्याच्या वतीने कार्याध्यक्ष रंजनाताई हजारे यांनी विठ्ठलमूर्ती आणि तुळशीहार घालून स्वागत केले.
 या संवाद यात्रेची सुरुवात आज सांगोला तालुक्यापासून होणार आहे. त्याठिकाणी प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील., महिला आघाडी अध्यक्ष सौ रूपालिताई चाकणकर,युवक चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर,उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे, आणि राष्ट्रवादीचे विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,
    या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये  पंढरपुर विधानसभा मतदार संघात आज सोमवारी दुपारी12वाजता ,संत तनपुरे मठ येथे येथे येणार आहे, तरी सर्व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही रंजनाताई हजारे यांनी केले आहे.