*करकंब पोलिसांचे चोरापासून सावध राहण्याचे आवाहन....!*

*करकंब /प्रतिनिधी*
करकंब येथील दर आठवडा बाजार च्या वेळी बाजारासाठी येणारे नागरिक विशेषता महिलावर्ग येत असल्याने या आठवडी बाजारामध्ये चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व बाजार करणारे लोकांनी आपण आपला मोबाईल, दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठेवून चोरांपासून सावध राहावे. असे आवाहन करकंब पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या दिवसाढवळ्या चोरी करणेत येत असल्याचे अनेक घटना कानावर येत आहेत. तरी आपल्या भागातील नागरिकांनी एकमेकांना सावध करून चोरावर लक्ष ठेऊन राहावे असेही आवाहन करण्यात येत आहे,