*अत्याचारग्रस्त मुलीला न्याय मिळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखाना निवेदन*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर येथे अत्याचार झालेल्या धनगर समाजातील मुलीला न्याय मिळावा म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी सो यांना आज भेटून निवेदन दिले तीव्र भावना व्यक्त केल्या लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी सदर केस जलद गती कोर्टात चालवावी व या गुन्ह्यामध्ये सरकारी गाडीचा वापर झालेला आहे. त्यांना सह आरोपी करावे पीडितेच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे सदर गुन्ह्य दाखल करण्यासाठी सहा तास फिर्यादीला बसवून ठेवले त्याबद्दल संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशा मागण्या केल्या. यावेळी बोलताना
भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर म्हणाले की जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच सरकार येतं व राष्ट्रवादीचा गृहमंत्री असतो तेव्हा बहुजनाच्या लेकीबाळी वर अत्याचार केला जातो ज्या गृहमंत्र्यांना झेड दर्जा संरक्षण होतं तेच ग्रहमंत्री फरार आहेत राज्यामध्ये धनगर समाजातील मेंढपाळ असतील अनेक महिला यांच्या वरती अत्याचार होत आहे तरीही हे निर्ढावलेले प्रस्थापितांच जातीवादी सरकार दुर्लक्ष करीत आहे.
यावेळी माऊली भाऊ हळणवर प्रा सुभाष म्हस्के आरपीआयचे दीपक चंदनशिवे, पंकज देवकते राजकुमार भोपळे ,दत्ता वाघमारे समाधान बाबर, रवी भोसले ,विजू खरे ,शरदचंद्र पांढरे, संजय लवटे दादा कोळेकर ,अण्णा उसके योगेश मेटकरी ,अनिकेत मेटकरी बबन बबन येळे, दीपक येळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते