*करकंब परिसरात विमानतळ शक्य...!* *माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का..?*
करकंब/ प्रतिनिधी
:-गेल्या कित्येक वर्षापासून करकंब हे सोलापूर जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक दृष्ट्या आणि करकंब व करकंब परिसरातील 40 ते 42 गावे फळबागांसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. देशाचे नेते माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांना करकंब व परिसरातील असलेली जाण पूर्वीपासूनच माहित आहे. राजकीय दृष्ट्या करकंब व करकंब परिसरातील आज तागायतपणे विकासाच्या नावाखाली वापर करून जो तो काय आपली पोळी भाजून घेत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून वंचित असलेल्या भागाला काही वर्षांपूर्वी जिल्ह्याचे विकासाचे नेतृत्व असलेले तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर ,बोरामणी ऐवजी करकंब लगत असलेल्या ढेकळेवाडी मेंढापूर या परिसरात विमानतळाबाबत प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या संदर्भात प्रचंड चर्चाही झाली. पण अकलूज करांचे हे विमान... बारा ..मती च्या गुंगीमुळे सुशील असलेल्या कुमारा ना ही....! हाताची ...घडी... घालून विमानतळाच्या बाबत चर्चेलाच पूर्णविराम दिला गेल्याने अकलूज करांच्या स्वप्नातले असलेले हे विमान करकंब येथे लँडिंग झाले नाही. अशी चर्चाही होत होती. पण करकंब परिसरातील ढेकळेवाडी, मेंढापूर भागात विमानतळ झाल्यास करकंब व परिसरातील फळबागा शेतकरी या परिसरात असलेले साखर कारखाने, शैक्षणिक सामाजिक,तसेच दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर चाही या निमित्ताने निश्चितच विकासात्मक दृष्टिकोनातून या भागाचा कायापालट होऊन हे काम मार्गी लागेल .असा विश्वास आजही अनेकांना वाटत आहे.
तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामांमध्ये सिंहाचा वाटा असून जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन विकासाची भूमिका घेतलेली असल्याने विशेषता माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनीही करकंब व परिसराकडे कधीही कानाडोळा वा दुर्लक्ष केले नाही. सध्या केंद्रात भारतीय जनता पार्टी व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सरकार असल्याने विमानतळाबाबतचा प्रश्न कालीन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते या निमित्ताने हा प्रश्न मार्गी लावतील अशी चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.