*करकंब येथील लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न.*

करकंब/ प्रतिनिधी :-
येथील आदर्श शिक्षण प्रसार मंडळ संचलित लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशालेत दिनांक 15 ऑगस्ट व अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून 15 ऑगस्ट उत्साहात संपन्न साजरा केला.
सुरुवातीस ध्वजारोहण मुख्याध्यापिका बानु कडगे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य, विद्यार्थ्यांची भाषणे तसेच पालकांचे मनोगत व्यक्त करून विविध सामाजिक उपक्रम करून यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या सोहळ्यास मुख्याध्यापिका बानू कडगे, डॉ.जमीर कडगे, सह शिक्षिका काझी, गायकवाड, शिंदे, नितीन गायकवाड तसेच पालक म्हणून ठोंबरे कुरणावळ भाळवणकर ,चौधरी, लिगाडे आदी सह बहुसंख्येने उपस्थित होते.