*प्राध्यापक नितीन शिवशरण यांना पीएचडी पदवीप्रदान*

पंढरपूर / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील प्राध्यापक नितीन शिवशरण यांनी डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स इव्हल्युएश्न ऑफ अलगोरिदमस फॉर डिटेक्शन अँड क्लासिकफिकेशन ऑफ डायबेटिक रेटीनोपॅची ग्रेडींग सिस्टीम या संशोधनाच्या विषयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे.
प्रा.डाॅ.नितीन शिवशरण यांचा शैक्षणिक प्रवास हा जिल्हा परिषद शाळा अकोले तालुका मंगळवेढा ते पीएचडी पुणे असा आहे.
सध्याते सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथील डॉ. संजय गनोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबाबत सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.