*अबब.. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्ते झाली तब्बल ५५गणेश मंडळची श्री ची पूजा* *पंढरपूर शहरातील संजयबाबा ननवरे यांची लोकप्रियता वाढली भलतीच!*

*अबब.. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्ते झाली तब्बल ५५गणेश मंडळची श्री ची पूजा*   *पंढरपूर शहरातील संजयबाबा ननवरे यांची लोकप्रियता वाढली भलतीच!*

पंढरपूर, प्रतिनीधी

पंढरपूर शहरात मागील काही दिवसातच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने नावारूपाला आलेले संजयबाबा ननवरे यांची लोकप्रियता भलतीच वाढली आहे अशातच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांना श्रीच्या आरती आणि पूजेसाठी बोलाविले असून या गणेशोस्तव कालावधीत पंढरपूर शहरातील तब्बल ५५गणेश मंडळातील पूजेसाठी हजेरी लावण्याचा विक्रम केला आहे, यावरून त्याची लोकप्रियता दिसून येत आहे.
    समजासेवक संजयबाबा ननवरे यांनी मागील काही दिवसात गरजू लोकांना मदत केली आहे, अनेकांना त्यांनी मोठा आधार दिला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आगृह केला जात आहे.
 ज्या ठिकाणी जातील तिथ आपली मदत पोहचावी हा प्रमुख उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी आजवर आपले नाव सर्वसामान्य कुटुंबपर्यंत पोहचविले आहे.
 कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी देणगी असो अथवा वैयक्तिक मदत असो ना चा पाढा त्यांच्या मुखातून कधी आलेला पंढरपूर वासियांना पाहायला मिळाला नाही. यामुळे त्यांचे कौतुकच वाढत आहे.
  सध्या संजयबाबा हे सामाजिक कार्यात दिसत आहेत. त्यांनी राजकारणात एन्ट्री करावी अशी पंढरपूर शहरातील नागरिकातून मोठी मागणी आहे. स्वयंभू नेतृत्व आणि निस्वार्थी भावना असल्याने त्यांनी आपल्या कडून निवडणूक लढवावी असे सर्वच नेतेमंडळींना वाटत आहे. यामुळे ते आगामी राजकारणात पंढरपूर येथील कोणत्या नेत्यांसोबत राहणार हे अद्याप आस्पष्ट असेल तरी ते पूर्वी स्व भारत भालके यांच्या सोबत होते. तर सध्या त्यांची आ. समाधान आवताडे यांच्या गटासोबत थोडी अधिकच सलगी वाढत चालली असल्याचे दिसत आहे.
 वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता समाजसेेवक संजयबाबा ननवरे यांच्या साठी सद्याची चालू असलेली समाजसेवा त्यांच्या राजकीय जीवनासाठी मोठी कामी येईल हे मात्र नक्की!