*करकंब येथील हनुमान जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी शशिकांत चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.*

*करकंब येथील हनुमान जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी शशिकांत चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.*

*करकंब/प्रतिनीधी 

करकंब येथील हनुमान जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी शशिकांत चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.*करकंब प्रतिनिधी:-येथील जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळाच्या जय हनुमान जयंती महोत्सवाच्या नूतन अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा शशिकांत (भाऊ) चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    यावेळी जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळाचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती महोत्सवाची बैठक संपन्न झाली. यामध्ये यावर्षीच्या हनुमान जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सलग तिसऱ्यांदा शशिकांत (भाऊ) चौगुले यांच्याकडे बिनविरोध देण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून विजय धोत्रे, यांची सचिव-केरू पवार, खजिनदार-विजय मोहिते अदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
    यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष-महिंद्र पवार, संजय मोहिते,  मा. ग्राम. सदस्य- सुनील मोहिते,  ग्राम. सदस्य- संतोष धोत्रे, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे ता. अध्यक्ष- संजय धोत्रे- शहराध्यक्ष-सुनिल धोत्रे, महेंद्र पेठकर, बंडू धोत्रे, भारतीय जनता पार्टीचे कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष- मनोज पवार, बाजीराव काळे आदिसह पदाधिकारी,समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
       या  हनुमान जयंती महोत्सव निमित्ताने गुरुवार - दिनांक-०६/४/२०२३ रोजी पहाटेपासूनच पूजाअर्चा , अभिषेक सोहळा, आरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दिवसभर सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे आयोजन केलेले असून सायंकाळी पाच वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्व समाज बांधव व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे . सोमवार-दिनांक -१०/४/२०२३ रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळ संचलित हनुमान जयंती महोत्सवाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.