*चौकाचौकात विकासाच्या मारता थापा... बार्डी - नवरा नवरी रस्ता कधी होणार पक्का....*! *विमानतळ झाले.. एम आय डी सी ची चर्चा झाली....पण कच्चा रस्त्याचे काय* : *प्रस्थापित नेते व लोकप्रतिनिधीचे पूर्णता दुर्लक्ष*

*चौकाचौकात विकासाच्या मारता थापा... बार्डी - नवरा नवरी रस्ता कधी होणार पक्का....*! *विमानतळ झाले.. एम आय डी सी ची चर्चा झाली....पण कच्चा रस्त्याचे काय* : *प्रस्थापित नेते व लोकप्रतिनिधीचे पूर्णता दुर्लक्ष*


 करकंब /प्रतिनिधी

: बार्डी ता पंढरपूर हे गाव तीन तालुक्याच्या सीमेवर असून हे गाव माढा मोहोळ पंढरपुर तीन तालुक्याची शेवटचे गाव म्हणून परिचित आहे. या गावाच्या क्षेत्रांमध्ये द्राक्षे डाळिंब बोर व इतर तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेला आपला माल विक्रीसाठी मोडनिंब मोठी बाजारपेठ असल्यामुळे व अंतर  जवळ असल्या कारणाने बार्डी ते नवरा नवरी या कच्चा असलेल्या रस्त्यावरून तारेवरची कसरत करून जीव मुठीत धरून जावे लागते. त्यातच मोडनिंब असो वा सोलापूर ला बारडी मेंढापूर जाधव वाडी पांढरेवाडी या गावातील लोकांना शेतकऱ्यांना याच मार्गे जावे लागते.या भागात फळबाग व तरकारी चे प्रमाण जास्त आहे. गावातील अथवा शेतातील एखादा आजारी पेशंट सोलापूर अथवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे असेल तर या रस्त्यावरून जाताना जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागत आहेत. गावातील आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे .गावातील स्थानिक नेते प्रस्थापित यांचेही याकडे पूर्णता दुर्लक्ष होत आहे, नुसत्या गाव भर विकासाच्या उदंड चर्चा ऐकायच्या आणि विकासाच्या नावे बोंब ... अशी सुज्ञ नागरिकातून बोलले जात आहे.
[02/01, 7:58 pm] Laxman Shinde: बार्डी ते नवरा नवरी हा रस्ता अडीच ते तीन किलोमीटर कच्चा रस्ता असून गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यावर डांबरीकरण केले नाही. या कच्च्या रस्त्यावरून या भागातील ग्रामस्थ शेतकरी ,शाळकरी , विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी ,आबाल वृद्ध ,बालगोपाळ ,विशेषता महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना प्रस्थापितांचे त्यातच विशेषता लोकप्रतिनिधीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. चौकाचौकात विकासाच्या मारता थापा... बार्डी ते नवरा नवरी रस्ता कधी होईल पक्का ... अशी चर्चा बार्डी व पंचक्रोशीत सुरू आहे. हा रस्ता कधी होणार या प्रतीक्षेत अजूनही लोक वाट पाहत आहे. या बार्डी च्या पंचक्रोशीत असलेल्या मेंढापूर व परिसरातील राजकीय स्तरावर विमानतळ होणार असल्याची चर्चाही झाली, विमानतळ कधी होणार विमानतळ झाले तर निश्चित कायापालट होईल या अजून ही आशेने व आतुरतेने विमानाची वाट पाहत आहेत. त्यातच बारडी मेंढापूर परिसरात एम आय डी सी साठी जमिनीचा सर्व्हे केला जाणार असल्याची चर्चाही झाली. त्यात भरीस भर म्हणून विमानतळ आता एमायडिसी पण इथे मात्र जीवघेण्या रस्त्यावरून दररोज प्रवास करावा लागतो याची खंत मात्र नागरिकांमध्ये आजही आहे.