*युवराजदादा पाटील गटाची  बुधवारी महत्वपुर्ण  बैठक* *विठ्ठलच्या निवडणुकीबाबत होणार विचार विनिमय बैठकीत होणार  घोषणा* *या बैठकीकडे सभासद आणि कामगार यांचे विशेष लक्ष*

*युवराजदादा पाटील गटाची  बुधवारी महत्वपुर्ण  बैठक*  *विठ्ठलच्या निवडणुकीबाबत होणार विचार विनिमय बैठकीत होणार  घोषणा*  *या बैठकीकडे सभासद आणि कामगार यांचे विशेष लक्ष*

पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील राजकीय आणि आर्थिक दृष्टया महत्वाचे स्थान असलेल्या श्री विठ्ठल सह साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये मुख्य घटक असलेल्या युवराजदादा पाटील गटाची नेमकी निवडणुकीत काय भूमिका असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यावर ठोस शिक्कामोर्तब करण्यासाठी  बुधवार दि १५ जून रोजी पाटील गटाची विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत  महत्वपूर्ण घोषणा होणार आहे.

 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराजदादा पाटील, संस्थापक व्हा चेअरमन स्व. यशवंभाऊ पाटील यांचे नातू ऍड गणेश पाटील यांनी एकत्रित येऊन ऍड दिपक पवार यांच्यासह स्व. अण्णांच्या गटाचे निष्ठावन्त कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ही विठ्ठलची निवडणूक लढविण्यासाठी  स्वतंत्र्य लढविण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून तयारी सुरू ठेवली आहे. या तयारीला मोठा पाठींबा मिळत आहे. 
या निवडणुकीच्या निमित्ताने   विठ्ठल परिवार एकदिलाने राहावा आणि भालके आणि पाटील गटाने एकत्रित येऊन निवडणूक लढवावी अशी काही नेत्यांची इच्छा आहे. तर युवराजदादा पाटील यांनी आपल्या साथीदारांसह स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी काही नेत्यांची इच्छा आहे. यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहता यावर ठोस मार्ग काढण्यासाठी बुधवारी सकाळी10 वाजता सभासद यांच्या विचाराने निर्णय घेण्यासाठी ही विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी कोणती भूमिका ठरणार यावरच विठ्ठलच्या या निवडणुकीची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
 ही विचारविनिमय  वाखरी रोडवर आनंदी विनायक मल्टी पर्पज हॉल येथे होणार आहे तरी सर्व सभासद ,कामगार यांनी सकाळी10वाजता उपस्थित राहून आम्हाला आपले म्हणणे सांगावे असे आवाहन युवराज दादा पाटील यांनी केले आहे.