*धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरददादा कोळी यांचा वाढदिवस पंढरपूरातही होणार साजरा* *विविध उपक्रमांचे केले आहे आयोजन* *भाई नितीन काळे यांची माहिती*

*धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरददादा कोळी यांचा वाढदिवस पंढरपूरातही होणार साजरा*    *विविध उपक्रमांचे केले आहे आयोजन*   *भाई नितीन काळे यांची माहिती*

पंढरपूर/प्रतिनिधी
  धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे  ओबीसी नेते सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व शरददादा कोळी यांचा  वाढदिवस  1 जुलै रोजी  अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा.करण्यात येणार असल्याची माहिती. आयोजक नितीन काळे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी  भाई नितीन काळे मित्र मंडळ आणि धाडस संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात येणार आहेत.
 धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख आपल्या कामातुन निर्माण केली व प्रस्थापितांना घाम फोडण्याचे ज्यांनी काम केले आहे ,असे ज्यांचे कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी गुणांचा संगम असणारे आदरणीय शरद दादा कोळी यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात येणार आहे .त्याचाच एक भाग म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीतही विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात येणार आहे .अशी माहिती धाडस संघटनेचे नितिन काळे यांनी सांगितले.    यावेळी नितीन काळे यांनी  सांगितले की दादांनी नेहमी गोरगरीब जनतेला आधार माया प्रेम व मदत देत आहेत. त्यांना गोरगरीबांचा नेता म्हणूनही ओळखले जाते.ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्याठिकाणी आदरणीय शरद दादा धावुन जातात व न्याय मिळवून देतात.. जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला धडा शिकविण्यासाठी धाडस संघटना नेहमी रणांगणात उतरलेली असते. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीले आहे.        आज महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली पाच हजारहुन अधिक शाखा महाराष्ट्रात आहेत व ही संघटना गावपातळीवर काम करत आहे असेही नितीन काळे यांनी सांगितले.
  ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठीही शरद दादा अहोरात्र मेहनत प्रयत्न, आंदोलने करत आहेत. म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक राज्याच्या बाहेर देखील होत आहे.. नक्कीच शरद दादा तुम्ही यशस्वी होणार असे नितीन काळे यांनी सांगितले. तरी या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नितीन काळे  त्यांनी केले आहे.