*पीएम केअर व मिशन वात्सल्य योजनेतून मयत दत्तात्रय खारे यांच्या मुलांना ३०लाख*

करकंब /प्रतिनिधी
येथील कनकंबा ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय खारे व त्यांच्या पत्नी संगीता खारे यांचे कोविड काळात गतवर्षी निधन झाले होते, त्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम केअर योजनेतून प्रत्येकी १० लाख व राज्य सरकारच्या मिशन वात्सल्य योजनेतून प्रत्येकी ५ लाख असे एकूण ३०लाख रुपये देण्यात आले.
माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख व मा सभापती रजनी ताई देशमुख यांनी पाठपुरावा करून खारे कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, दत्तात्रय खारे यांना दोन मुले आहेत या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५लाखाचा विमा ही लागू करण्यात आला आहे, शिक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीने दरमहा अकराशे व केंद्र सरकारच्या वतीने दरमहा दोन हजार रुपये त्यांना १८वर्षे वय होई पर्यंत मिळणार आहेत.तसेच करकंब पप्पू व्यवहारे व रघुनाथ भंडारे यांच्या मुलांना ही दरमहा शासनाच्या वतीने अकराशे रुपये मिळणार आहेत
कोविड मूळे अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती मयत झाल्याने त्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज होती, केंद्र व सरकार व राज्य सरकार ने योजना तयार करून अशा कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. पीएम केअर योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील ४१ तर पंढरपूर तालुक्यातील ९ कुटुंबातील मुलांना मिळाला आहे.
चौकट
खारे परिवाराला मदत
दत्तात्रय खारे यांनी करकंब परिसरातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींची मोफत लग्न करून दिली होती, तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली होती .दत्तात्रय खारे व त्यांच्या पत्नी चे गतवर्षी निधन झाले होते त्याच्या मुलांसाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे.