*पंचायतराज समिती सदस्यांची शिवसेनेचे महेश साठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*

पंढरपूर /प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पंचायत राज समिती कार्यरत आहे. प्रत्येक तालुक्यातील विकास कामांची पाहणी करत आढावा घेत आहे. पंढरपूरमध्ये आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी येथील शिवसेना नेते महेश (नाना) साठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा पंचायतराज समिती गेल्या तीन दिवसापासून घेत आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी सकाळीच या समितीतील सदस्यांचे आगमन झाले. पंचायतराज समितीचे अध्यक्ष आ. संजय रायमुलकर( शिवसेना आमदार) तसेच आ. कृष्णा गजबे ( भाजपा आमदार) यांनी प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात थांबून तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर येथील शिवसेना नेते महेश नाना साठे यांचे आमंत्रण स्वीकारीत टाकळी रोड येथील विठाई निवास गाठले.
शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे यांनी या आमदार मंडळींचे जोरदार स्वागत केले. याच ठिकाणी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी साठे कुटुंबातील महेश साठे विठाई कन्स्ट्रक्शनचे प्रमुख संजय साठे आणि परिवारातील कृष्णा साठे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. येथील सदिच्छा भेट आटोपून या समितीने तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाकडे प्रयाण केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मेहकर नगरपरिषदेचे नगरसेवक आणि शिवसेना नेते रामेश्वर भिसे, पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, महाराष्ट्र राज्य सरपंच संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख, याशिवाय ग्रामविकास अधिकारी दादासो चव्हाण, भगवंत कुलकर्णी, राजेश कोळी, बंडोपंत घोडके, यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.