*ऍड संजीवनी चुंबळकर यांची योग्य निवड* *शिवसेनेच्या जिल्हा उप संघटीका म्हणून दिले निवडीचे पत्र*

*ऍड संजीवनी चुंबळकर यांची योग्य निवड*  *शिवसेनेच्या जिल्हा उप संघटीका म्हणून दिले निवडीचे पत्र*

पंढरपूर/प्रतिनीधी 

पंढरपूर येथील ऍड संजीवनी महेश चुंबळकर यांची शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हा उप संघटीका म्हणून निवड करण्यात आली आहे.
     शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने,  शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या व प्रवक्ता तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक  संजनाताई घाडी व शिवसेना उपनेते शीतल देवरुखकर - शेठ आणि शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
  सदरचे नियुक्तीपत्र जिल्हा संघटिका ऍड पूनम अभंगराव जाधव यांच्या सहीने देण्यात आले आहे. नियुक्ती पत्र मिळताच ऍड संजीवनी चुंबळकर यांनी आपण शिवसेना पक्ष वाढीसाठी कायम प्रयत्न करून पक्षाच्या ध्येयधोरणनुसार काम करणार असल्याचे सांगितले.