*राष्ट्रवादीचे प्रमुख खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिष्ठानकडून पालवीमधील विद्यार्थ्यांना अन्न धान्याचे वाटप**आता शरद प्रतिष्ठिची जबाबदारी दिली आहे दिवंगत जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे यांचेच बंधू दिनेश गोडसे यांच्याकडे*

*राष्ट्रवादीचे प्रमुख खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिष्ठानकडून पालवीमधील विद्यार्थ्यांना अन्न धान्याचे वाटप**आता शरद प्रतिष्ठिची जबाबदारी दिली आहे दिवंगत जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे यांचेच बंधू दिनेश गोडसे यांच्याकडे*

पंढरपूर /प्रतिनिधी

राष्ट्रवादी प्रमुख खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले .याचवेळी शरद प्रतिष्ठानच्या वतीने येथील पालवी या संस्थेत विद्यार्थ्यांना अन्न वाटप करण्यात आले . हे अन्नवाटप राष्ट्रवादी नेत्या प्रणीताताई भालके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भोसले, शरद प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष  दिनेश गोडसे, राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हाध्यक्ष शुभांगीताई जाधव, आप्पासाहेब थिटे, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत सिद्धेश्वर बंडगर , विजय आरकिले आदी मान्यवर उपस्थित होते.
     सबंध राज्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. याचवेळी पंढरपूर तालुक्यातही या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शरद प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना अन्न वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . पंढरपूर शहरातील पालवी या एड्सग्रस्त विद्यार्थ्यांच्या संस्थेतील मुलांना अन्न वाटप करण्यात आले. सौ. प्रणिताताई भालके तसेच इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला . यावेळी येथील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील कांदे ,बटाटे तसेच फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी या संस्थेच्या संचालिका मंगल शहा याही उपस्थित होत्या.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रणिताताई भालके यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णा हजारे यांनी केले.

याप्रसंगी शरद प्रतिष्ठानचे सवंगडी आण्णा हजारे, सोमनाथ पवार, सिद्धू बंडगर, अविनाश भोसले,विजय कुमार डोके,आसिफ मुजावर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.


चौकट

शरद प्रतिष्ठानचे दिवंगत  जिल्हाध्यक्ष  गणेश गोडसे यांची जागा आता त्यांचेच बंधू दिनेश गोडसे यांनी भरून काढली आहे.रविवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, शरद प्रतिष्ठानकडून पालवी मधील विद्यार्थ्यांना अन्न वाटपाचा कार्यक्रम पार पडला .यावेळी दिनेश गोडसे हे उपस्थित होते दिनेश गोडसे हे गणेश गोडसे यांचे भाऊ असून,गणेश गोडसे यांच्या आकस्मित निधनानंतर, आ.रोहित पवार यांनी त्यांना बोलावून घेत, शरद प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली असल्याचे सांगण्यात आले.