*जिल्हाधिकारी यांच्यासोबतची बैठक यशस्वी* *धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांची माहिती*

पंढरपूर /प्रतिनिधी
आषाढी वारी महापुजेवेळी धनगर समाजाने विविध मागण्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा केली. यामध्ये यशस्वी तोडगा निघाला असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बरोबर शनिवारी बैठक पार पडली आहे .
या बैठकीत पुढीलप्रमाणे तीन मागण्या मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.
पंढरपुर येथे पु. अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनसाठी जागा व निधी उपलब्ध करून देणे. धनगर समाजातील तरुणांना आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योग धंदा उभारण्यासाठी बिन व्याजी विना तारण तीस लाखरुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा.
यापैकी वरील पहिल्या दोन मागण्या तत्काळ मान्य करुन एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. मागणी क्रमांक ( ३ ) हे शासन स्तरावर असल्या मुळे शासन स्तरावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे मुख्यमंत्र्याच्या भेटी नंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल.
या बैठकीसाठी जिल्हापोलीस प्रमुखं शिरीष सरदेशपांडे साहेब,पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले , तहसीलदार सचिन लंगुटे, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीसाठी ,माऊली हलनवर, आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के , सोमनाथ ढोणे, पंकज देवकाते, प्रशांत घोडके,संजय लवटे (सर), प्रसाद कोळेकर, अजय देशमुख, सतीश लवटे उपस्थीत होते.