*कोरोनामुळे बंद झालेले  दलित मित्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करा!* *राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी*

*कोरोनामुळे बंद झालेले  दलित मित्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करा!*  *राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी*

पंढरपूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे  यांनी आज मंत्रालय येथे जाऊन भेट घेतली.यावेळी फाटे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर निवेदन दिले. यामध्ये दलित मित्र आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सुरू करण्याची मागणी केली.

सदर निवेदनामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे १९७१/७२ पासून महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र राज्यातील  समाजामध्ये भरीव काम करणाऱ्या व्यक्तीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व दलित मित्र या नावाने दिला जाणारा पुरस्कार  कोरोना प्रादुर्भावा मुळे महाराष्ट्र शासनाने कोणताही पुरस्कार दिलेला नाही. तरी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे  डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार चालू करून महाराष्ट्र राज्यामध्ये समाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करावे  डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार चालू करावा असे निवेदनात म्हटले आहे .
 ;सदर निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे अध्यक्ष मा नागेश फाटे व महाराष्ट्र प्रदेश सचिव  कल्याण कुसूमडे उपस्थित होते .