*निवडणुकीत विरोधकांची ताकद समजेल* *आमचे उमेदवारच आहेत सभासदांचे पाठबळ असलेले*

पंढरपूर/ प्रातींनीधी
केवळ विरोध करायचं म्हणूनच, या सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी मागील अनेक दिवसापासून काहीजण अतुर झाले आहेत. मात्र त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आम्ही निवडणार असलेले उमेदवार खंबीर आहेत. त्यामुळे त्यांची ताकद यावरच त्याची जागा समजेल अशी प्रतिक्रिया विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी पार पडली यांनतर काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माहिती दिली.
साखर कारखाना चलविताना अडचणी येतात. त्यावर मात करणे ही संचालक मंडळाची जबाबदारी असते. आम्ही अडचण असतानाही कारखाना सुरू ठेवला. मागील अनेक वर्ष आपण इतर कारखान्याच्या तुलनेने दर दिला आहे. त्यामुळे विरोधक यांच्या आरोपाला न जुमानता सभासद जाणीव ठेवून आम्हालाच संधी देणार असल्याचे सांगितले.
निवडणूक ही प्रक्रिया म्हणून आम्ही याकडे पाहात आहे.यामध्ये आम्ही सावध भूमिका घेऊन ही प्रक्रिया पार पाडत आहे. विरोधक कोण आणि किती याची कोणतीच काळजी आम्ही करणार नाही. आमचे सभासद आमच्यावर विश्वास ठेवणार असल्याने कसलीही चिंता आमच्या उमेदवारांत नसल्याचे सांगितले.
या निवडणुकीच्या निमित्ताने गाटीभेटी सुरू राहतील, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर आमचं उमेदवार समजतील. असेही काळे यांनी सांगितले.
चौकट
*विद्यमान संचालक मंडळात किरकोळ खांदेपालट?*
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखाना निवडणुकीत , विरोधक यांना आयते उमेदवार मिळू नये , यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार नाही. असे चित्र काळे गटातून दिसून येत आहे.