*नागेश फाटे कन्स्ट्रक्शन कंपनीचा १६वर्धापन दिंन साजरा*

*नागेश फाटे कन्स्ट्रक्शन कंपनीचा १६वर्धापन दिंन साजरा*

पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर येथील नागेश फाटे कन्स्ट्रक्शन्स कंपनीचा १६ वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात फाटे शोरुम येथे कंपनीचे संस्थापक नागेश फाटे यांचे अध्यक्षतेखाली तर सह.शिरोमणीचे माजी संचालक सुधाकर कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.


   वर्धापन दिना निमित्ताने कंपनीत विविध पदावर उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या २० कर्मचारी बांधवांना यावेळी प्रशस्ती पत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
    यावेळी एकनाथराव फाटे,संचालक डॉ.रमेश फाटे,उमेश फाटे व शुभम फाटे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी डॉ.रमेश फाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
     याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुधाकर कवडे यांनी नागेश फाटे यांचे जीवन प्रवासातील  अनेक आठवणींना उजाळा देत  त्यांच्या या यशाचे गमक उपस्थितांना सांगत जिद्दीने आणि चिकाटीने उद्योग केल्यास निश्चितच यश प्राप्ती होते असे सांगून त्यांनी फाटे परिवार व त्यांच्या सर्व स्टाफला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
    आपल्या अध्यक्षीय भाषणात नागेश फाटे अत्यंत भावुक होत कंपनी  उभा केल्या पासून आजतागायत १६ वर्षाचा उद्योग क्षेत्रात प्रवास करत असताना जिद्द मनाशी बाळगत यश प्राप्त करीत आज आपल्या सहकार्याने  इथ पर्यंत पोहचलो असून पुढील काळातही आपण सर्वांनी अशीच साथ द्या असे आवाहन करीत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती भटकर,विनय शिंदे,सलीम सय्यद,विकास घाडगे,संग्राम कापसे,संदीप राय आदी कंपनीचे सहकारी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय काळे यांनी केले.