*एसटी महामंडळ कर्मचारी यांच्या संपास जाहीर पाठिंबा*

पंढरपूर/प्रतिनिधी
सरकारने कुठलाही विचार न करता कर्मचारी यांचे निलंबन करण्याची भूमिका घेतली आहे कर्मचारी गेले कित्येक दिवस आपल्या मागण्या साठी आंदोलन करीत आहेत . त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे . त्या कडे सरकारने कोणताही तोडगा निघाला नाही . कर्मचाऱ्यांवर अन्याय चालु आहे. जर सरकारला व महामंडळ यांना आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळता येत नसेल तर सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोकांना सामान्य जनतेला त्रास होतो आहे. यामध्ये काही तोडगा काढण्यासाठी शासनाने चांगली भूमिका घेतली पाहिजे.
*त्यांचं निलंबन करण्याची भूमिका निषेधार्ह आहे* . त्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे. अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेतली असून शासनाने कर्मचारी यांच्या हिताचा विचार करावा अशी मागणी रिपब्लिकन आठवले श्रमिक ब्रिगेड कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कुमार ढवळे यांनी पत्रक काढून केली आहे.