*स्वकष्टातून ध्यास घेतला.... मुलीने घेतली गरुड भरारी......*! : *बार्डी या ग्रामीण भागातून महिला डॉक्टर होण्याचा धनश्री सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे हिने मिळविला बहुमान*

करकंब /प्रतिनिधी
: बार्डी ता पंढरपूर यासारख्या कायम दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागातील सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे (सर) यांनी स्वकष्टातून एकच ध्यास घेऊन नियोजन बद्ध पद्धतीने आपल्या मुलांनी ग्रामीण भागातून जाऊन चांगले शिक्षण घ्यावे ही जीवाची तळमळ त्यांना शेती राजकारण उद्योग करीत असताना झोप येऊ देत नव्हती अशात ही सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे (सर) यांची मुलगी धनश्री हिने वैद्यकीय क्षेत्रातील ही पदवी संपादन करून बार्डी सारख्या ग्रामीण भागातून प्रथम महिला डॉक्टर होण्याची गरुड भरारी घेऊन बहुमान मिळवल्याने बार्डी तसेच करकंब व परिसरातून तिचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
: डॉक्टर धनश्री सुरेश अंबुरे हिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण बार्डी ता पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाले. पुढचे शिक्षण बारामती येथे पूर्ण करून वैद्यकीय शिक्षण हे डी वाय पाटील पुणे येथे पूर्ण केले. डॉक्टर धनश्री सुरेश अंबुरे ही प्रत्येक वर्षी टॉपर म्हणून डी वाय पाटील कॉलेज पुणे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनी म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीमध्ये पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची काळजी घेऊन कोरोना रुग्णांची सेवा केली. बार्डी सारख्या दुर्गम आणि कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या ग्रामीण भागातून एक महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवून एकूणच गरुडभरारी घेतल्यामुळे या करकंब व बार्डी परिसरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. एकीकडे वडील सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे (सर) यांना शेती उद्योग राजकारण यामधून आपल्या मुलांकडे शिक्षणाच्या बाबतीत वेळ न देता मुलांनीही वडिलांच्या स्वप्नांना आकार देऊन स्वतः मुलांनीही शिक्षण क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेण्याचा संकल्प केला. आणि तो यशस्वी झाला. बार्डी मधून महिला डॉक्टर होण्याचा पहिला बहुमान मुलीने मिळवला याचा अभिमान निश्चित वडिलाला मिळाला. एक मुलगा लॉ चे शिक्षण तर दुसरा मुलगा एमपीएससी ची तयारी करतोय, अर्थ सायन्स कॉमर्स या वेगवेगळ्या विषयावर दोन्ही मुले तयारी करीत आहेत.आणि वडील सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे (सर) यांनी स्वकर्तृत्वातून एक ध्यास घेऊन नियोजन बद्ध केल्यामुळे आजच्या काळातही ग्रामीण भागातील मुलानी आज हे यश प्राप्त केले.
सुरेश उर्फ भाऊसाहेब अंबुरे (सर) हे सध्या शेती उद्योग तसेच भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.