*करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील ७५ झाडांच वृक्षारोपण .....!* *लेकीचे झाड चे संकल्पक व टीमला मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा* *करकंब पत्रकार संघ व करकंब पोलीस स्टेशन, तसेच लेकीच्या हस्ते केले वृक्षारोपण* *पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी यापूर्वी वृक्षारोपण करून जोपासण्याचा केला गौरव*

करकंब/ प्रतिनिधी
करकंब येथे आज रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.करकंब पत्रकार संघ,करकंब पोलीस करकंब पोलीस स्टेशन,व लेकीच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु.व पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे व पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत बनकर. करकंब अध्यक्ष भिमा व्यवहारे सर,लक्ष्मण जाधव,सचिन शिंदे,गोपीनाथ देशमुख, राजेंद्र करपे,मनोज पवार,लक्ष्मण शिंदे,शहाजी काळे,व गावची लेक डॉ. चैताली रसाळ लेकीचं झाड संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे.व टीम यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निलेश तारु म्हणाले लेकीचे झाड अभियान गावासाठी सुंदर उपक्रम असून या अभियानात भावनिक नाते निर्माण होऊन लेकीना जोडल गेल असल्याने आनंद वाटला जशी ही झाड लावलीत तशी ही जोपासली जातील असा विश्वास तरुणांचा उत्साह पाहून वाटतो. या वेळी पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार सुर्यकांत बनकर यांनी सांगितले. हा गावास या अभियानाचा खुप फायदा होणार असून ही झाड टिकवण्यासाठी सर्व करकंब करांनी साथ दिली पाहिजे.पुढील काही वर्षात ही झाड करकंब गावची शोभा ठरणार आहेत. आयुष्यभर लेकीच झाड त्यांच्या रूपातून कायम आठवणीत राहणार आहे.तसेच लेक डॉ. चैताली रसाळ यांना हा उपक्रम खुप आवडला.सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने जर पर्यावरण पूरक उपक्रमामुळे सगळ्या गावात राबवला तर खुप फायदा भविष्यात होणार आहे. यावेळी लेकीचं झाड टीम मधील ज्ञानेश्वर दुधाणे,पांडुरंग काटवटे,नंदलाल कपडेकर, हरिश्चंद्र वास्ते,अक्षय नगरकर,विजय जाधव,गणेश पिसे,प्रमोद रेडे,विजय दुधाणे, आत्माराम चवरे आदी तरूणांनी अधिक परिश्रम घेतले,पुढील काळात झाडांसाठी कायपण घोषणा देऊन सर्वांचा उत्साह वाढवला.*