*पुन्हा उद्योजक राजू खरे यांची१लाख १हजाराची पहिली कुस्ती*  *मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथेही कुस्ती फडाचा नारळ फोडण्याचा मान खरे यांनाच*

*पुन्हा उद्योजक राजू खरे यांची१लाख १हजाराची पहिली कुस्ती*   *मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथेही कुस्ती फडाचा नारळ फोडण्याचा मान खरे यांनाच*

पंढरपूर/प्रतिनीधी 

मोहोळ तालुक्यातील पाटकुल  येथे  खंडोबा यात्रे निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य निकाली कुस्ती स्पर्धेसाठी पहिल्या कुस्तीसाठी १लाख १हजार रुपयाचे रोख बक्षीस उद्योजक राजू खरे यांनी दिले. त्यांच्याच हस्ते या कुस्ती मैदानाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
मंगळवार दिनांक १९डिसेंबर रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे यांचे जंगी स्वागत करीत आयोजन समितीच्या वतीने पुष्पहार, श्रीफळ व फेटा घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या मैदानात अनेकानेक तुल्यबळ पैलवान झुंज देऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत होते, मोहोळ तालुक्यातील वाढत्या कुस्त्या आणि मैदाने आणि या मैदानाचे उत्कृषटरित्या केलेले नियोजन पाहून अतिशय आनंद वाटला.
तसेच गावातील "खंडोबा मंदिर" व "मरीआई मंदिर" याठिकाणी जाऊन दर्शन घेतले.
या कुस्ती स्पर्धेसाठी जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, माजी नगराध्यक्ष न.प.पंढरपुर मा.वामन(तात्या) बंदपट्टे, उपसरपंच गणेश नामदे, पेनुरचे सरपंच सुजित आवारे,वस्ताद पै.बाळासाहेब चवरे, सोलापूर जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव सर,बेगमपुर सरपंच प्रकाश सपाटे,डिप्युटी अनिल बनसोडे,संजय मस्के 
,पांडुरंग डोंगरे,पारस कांबळे,रंगनाथ गुरव,युवा नेते गणेश जाधव, उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे,मोहोळ तालुका उपप्रमुख म.अमर सोनवले,दादा गायकवाड,शंकर शिंदे,मा.कृष्णा शिंदे,लखन वाघमारे,निखील गायकवाड,अतिश सावंत यांच्या सह पाटकुल, मोहोळ पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन, नेते मंडळी, वस्ताद मंडळी, पंच कमिटी, विविध भागातून आलेले पैलवान, गावातील जेष्ठ आणि तरुण सहकरी उपस्थित होते.