*जनक्रांती दलित पँथरच्या पदाधिकारी निवडी जाहीर*

पंढरपूर /प्रतिनिधी
जनक्रांती दलित पँथर राष्ट्रीय पक्षाची बैठक मंगळवेढा येथे होवून या बैठकीमध्ये विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्र.अशोक तांबे हे होते. तर यावेळी महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष गोविंद चुबूकनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आबासाहेब तुकाराम ससाणे , सोलापूर जिल्हाध्यक्षपदी शहाजान पटेल, जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन बनसोडे, जिल्हा सचिवपदी जहांगीर काझी, जिल्हा संघटकपदी महादेव माने, जिल्हा प्रिसध्दी प्रमुखपदी श्रीकांत जाधव, सोलापूर लोकसभा मतादारसंघ अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे आदी पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा .अशोक तांबे व प.महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष गोविंद चुबूकनारायण यांनी मार्गदर्शन करताना पक्षाची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी पदाधिकार्यांनी जोमाने कार्य करावे. तसेच सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घ्यावा असे अवाहन केले.
आयोजीत करण्यात आलेल्या या बैठकीप्रसंगी जनक्रांती दलित पँथर राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.