*सरपंच पतीच्या आणि सदस्यांच्या उचापती.... गावाची कशी होणार प्रगती.....! *मेंढापूर ग्रामपंचायत चा अजब कारभाराचा गजब नमुना *मेंढापूर ग्रामपंचायतीची बेकायदेशीर कृती

करकंब /प्रतिनिधी:
सध्या पंढरपूर तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये महिला राज असतानाही अनेक ग्रामपंचायतच्या महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतची सरपंच या प्रथम नागरिक या नात्याने गाव गाडा कशा पद्धतीने चालवावा हे अधिकार असतानाही काही ग्रामपंचायत मधून महिला सरपंच असलेले पतिराज आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी सदस्य हेच गावाचा भार डोक्यावर घेऊन चालवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अशाच ग्रामपंचायत पैकी मेंढापूर तालुका पंढरपूर येथील मेंढापूर ग्रामपंचायतच्या अजब कारभाराचा गजब नमुना लोकांसमोर आल्यामुळे याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे.
मेंढापूर ग्रामपंचायत च्या या बेकायदेशीर कृत्याबाबत माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना दिनांक 30 11 2021 रोजी लेखी निवेदन दिले होते. तरीही या मेंढापूर ग्रामपंचायत च्या प्रशासन व पदाधिकारी यांना कसल्याही प्रकारे गंभीर नसल्याने या ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचा गजब नमुना समोर आला आहे. सततच्या उचापती करण्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. अशा उचापती करण्यामुळे गावाची प्रगती होण्यापेक्षा गावाची या सगळ्यांचा संगनमताने अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा ही गावातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
मेंढापूर तालुका पंढरपूर येथील सुमन लक्ष्मण शेजाळ यांची ग्रामपंचायत गावठाणा लगत आठ गुंठे खुली जागा असून या जागेचा गट नंबर 699 असा आहे. ही खुली जागा दिनांक 17 /10 /2019 रोजी कायम खुश खरेदी करून या जागेचा कब्जा घेतलेला आहे.आजही ही जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे .पण येथील मेंढापुर ग्रामपंचायत चे सरपंच त्यांचे पती व ग्रामपंचायत सदस्य भारत नामदेव कोकरे आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने सुमन शेजाळ यांच्या खुल्या जागेत बसण्यासाठी बाकडी टाकून तसेच हायमास्ट दिवा चे फाउंडेशन करून या ग्रामपंचायतीने बेकायदेशीर अतिक्रमण करून मानसिक व आर्थिक त्रास देऊन अशी बेकायदेशीर कृती केल्याची लेखी तक्रार माननीय जिल्हाधिकारी सोलापूर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे वारंवार पणे दिलेली होती. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही नाप्रशासनाकडून झाली... ना ग्रामपंचायतीला याचे सोयरसुतक नाही. जर कुंपणच शेत खायला लागले तर सांगायचे कोणाला अशी गत झाल्याची भावना सुमन लक्ष्मण शेजाळ यांनी यावेळी व्यक्त केली. जर ग्रामपंचायत अतिक्रमण करायला लागली व आमच्या सारख्या सामान्य लोकांवर अन्याय करून जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे संबंधित विरोधात आम्ही करकंब पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रारही दाखल केली असल्याचे सांगितले.
मेंढापूर ग्रामपंचायत च्या या बेकायदेशीर कृत्याबाबत माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना दिनांक 30 /11 /2021 रोजी लेखी निवेदन दिले होते. तरीही या मेंढापूर ग्रामपंचायत च्या प्रशासन व पदाधिकारी यांना कसल्याही प्रकारे गांभीर्य नसल्याने या ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचा गजब नमुना समोर आला आहे. सततच्या उचापती करण्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. अशा उचापती करण्यामुळे गावाची प्रगती होण्यापेक्षा गावाची या सगळ्यांच्या संगनमताने अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा ही गावातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
चौकट:
मेंढापूर ग्रामपंचायतची सात गुंठे जागा असून सध्या गावामध्ये अहिल्या चौक म्हणून मुख्य चौक असल्याने गावाच्या दृष्टीने या चौकाचे सुशोभिकरण व्हावे या प्रामाणिक हेतूने व सर्वांच्या सहमतीने हे काम केले आहे. जरी याबाबत संबंधितांना काही शंका असल्यास त्यांनी कायदेशीर रित्या भुमिअभिलेख यांच्याकडून रीतसर पणे मोजणी करून घ्यावी याबाबत ग्रामपंचायत ची कोणतीही हरकत वा त्याला तक्रार राहणार नाही.
सौ जाई दिलीप कोरके
सरपंच मेंढापूर ग्रामपंचायत