*राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्या बँकेचे होणार उदघाटन* *विजयादशमीच्या मुहूर्तावर पंढरपूर तालुक्यातील सर्वच दिग्गज नेत्याची राहणार उपस्थिती*

*राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्या बँकेचे होणार उदघाटन*  *विजयादशमीच्या मुहूर्तावर पंढरपूर तालुक्यातील सर्वच दिग्गज नेत्याची राहणार उपस्थिती*

पंढरपूर/प्रतिनीधी 

राष्ट्रवादी काँगेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या श्री विठ्ठल अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेड, पंढरपूरचा  या शाखेचा उद्घाटन सोहळा बुधवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पंढरपूर तालुका आणि शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळींची उपस्थिती राहणार आहे

.
 या शाखेचे  उद्घाटन येथील तालुका पोलीस स्टेशनच्या मागे, मार्केटयार्ड शॉपिंग सेंटर नं.३, गाळा नं.५, पंढरपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.  सह. शिरोमणी, वसंतराव काळे सह. सा. का. चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या शुभहस्ते तसेच पांडुरंग सह. सा. का. चेअरमन  प्रशांतराव परिचारक  यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. 
  या कार्यक्रमाचे वेळी  ह.भ. प. जयवंत महाराज बोधले, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, माजी चेअरमन भगीरथ भालके, धनश्री परिवाराचे नेते शिवाजीराव काळूंगे, पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक , चेअरमन प्रकाश पाटील, विक्रम कदम, नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे, डॉ बी पी रोंगे,  युवराज पाटील युवा नेते समाधान काळे, यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, सहकार शिरोमणीचे संचालक मंडळ, यशवतराव नागरी सह पत संस्थेचे संचालक मंडळ, प्रतिभादेवी नागरी सह पत संस्थेचे संचालक मंडळ, आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व विभागातील पदाधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नागेश फाटे यांनी केले आहे.