*पेहे येथे सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिर संपन्न.*

करकब/प्रतिनिधी
पेहे ता पंढरपुर येथे डॉ. प्रसाद पूरवत व डॉक्टर स्नेहा प्रसाद पूरवत यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्त्रीरोग विकार, गर्भाशय पिशवी विकार, कॅन्सर, गर्भाशय पिशवी चे ऑपरेशन, मासिक पाळीच्या तक्रारी, प्रसूतिपूर्व व तपासणी सिजोरियनसह, वंधत्व निवारण, कुटुंब नियोजन ऑपरेशन, व गर्भ निरोधक सल्ला तसेच मुळव्याध ,भगंदर, पाईल्स फिशर फिशुला पायलो नीडल, सायनस, पोटाचे आजार, हर्निया उपचार व शस्त्रक्रिया या विविध उपचाराबाबत या शिबिरामध्ये सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. प्रसाद दिलीप पुरवत(एम एस जनरल सर्जन), डॉ. स्नेहा पूरवत(एम एस स्त्री रोग तज्ञ, प्रसूती शास्त्र), सरपंच सोमनाथ गायकवाड उपसरपंच धनाजी गायकवाड ग्रामसेवक सोमनाथ हडपे डॉ. गुंजाळ, डॉक्टर वनवे, उषा मेत्रे सुप्रिया शिंदे आशिष वाघमारे आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ रुग्ण उपस्थित होते.