*गड आला पण सिंह गेला.... मारुती भुसनर अवघ्या नऊ मतांनी पराभव..*.. *आव्हे-तरटगाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनेते स्व. श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व....*.!

*गड आला पण सिंह गेला.... मारुती भुसनर अवघ्या नऊ मतांनी पराभव..*.. *आव्हे-तरटगाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनेते स्व. श्रीमंत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व....*.!

करकंब/ प्रतिनिधी

आव्हे-तरटगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक प्रणित , लोकनेते स्व. सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनल आठ जागा जिंकून चाळीस वर्षाची सत्ता मोडीत काढून लोकनेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित करून सत्ताधारी पॅनलला दे धक्का दिला आहे.


 या लोकनेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनल चे युवा प्रमुख मारुती भुसनर यांनी या सोसायटीच्या माध्यमातून एक चांगली फळी निर्माण करून परिवार एकसंघ करून या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य करून प्रस्थापितांची सोसायटीची चाळीस वर्षाची सत्ता हस्तगत केली. पण या निवडणुकीत अवघा थोडक्या मतांनी मारुती भुसनर यांना पराभव स्वीकारावा लागला. गावाला व परिसरातील गावांना याचे शल्य लागून राहिले .असले तरी लोकांमध्ये गड आला.. पण सिंह गेला ....! अशी चर्चा सुरू होती. या निवडणुकीत सरपंच-रणजीत (दादा) कांबळे, ज्येष्ठ नेते धोंडीराम (अण्णा) पाटील, शंकर हाके, युवा नेते सर्जेराव पवार युवा नेते विनोद दादा जगताप नानासाहेब आयरे संपत पाटील दिपक पिंजारी माजी सरपंच बिट्टू नाना करवर ज्येष्ठ नेते भिकू दादा ननवरे मार्गदर्शक शहाजीबापू पाटील दत्ता नाना बनसोडे लहू बापू यमगर प्रवीण पाटील राजकुमार नाना पाटील आप्पासाहेब करवर आमचेही मोलाचे सहकार्य लाभले.


   स्व. सुधाकरपंत परिचारक सोसायटी परिवर्तन पॅनल ने तेरापैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. या निवडणुकीत चंद्रकांत भिकू बनसोडे, अमर दत्तात्रय जगताप, इंदुबाई वसंत हाके, विमल सावळा खुळे, सुरेश विठोबा दबडे, वसंत सदाशिव हाके, कांबळे दादू तुकाराम, भाऊ बाबू खोत, नवनाथ दादा पिंजारी यांनी विजय प्राप्त केला. विजयी उमेदवारांची व विशेष परिश्रम घेतलेले युवा नेते प्रमुख मारुती भुसनर व विजयी उमेदवारांची गुलाल उधळून उत्साहात विजयी मिरवणूक काढण्यात आली.