*जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त उपविभागीय अधिकारी संभाजी गरड यांची पदोन्नती पर नियुक्ती...*...!  *सपोनि निलेश तारु व पो. उपनिरीक्षक महेश मुंडे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार सोहळा संपन्न.*

*जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त उपविभागीय अधिकारी संभाजी गरड यांची पदोन्नती पर नियुक्ती...*...!  *सपोनि निलेश तारु व पो. उपनिरीक्षक महेश मुंडे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार सोहळा संपन्न.*

 करकंब/ प्रतिनिधी

 करकंब येथील भीमा पाटबंधारे उपविभाग या कार्यालयातील संभाजी वसंत गरड यांची भीमा पाटबंधारे उपविभाग करकंब  येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने तसेच त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान व सत्कार करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु व पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
  यावेळी आर एन साळुंखे व्ही पी सावंत, पि.के. ढवळे बी टी डोके एस एम साळुंके एम एस देवकर एस व्ही चव्हाण यु बी गोडसे एस एन सरवदे व सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते
   या कार्यक्रमास शाखाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी संभाजी गरड यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या कामाच्या सचोटीने आज पर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून पंचवीस वर्ष सेवा केली असल्याचे सांगितले.
   सत्कार सोहळा बोलताना उपविभागीय अधिकारी संभाजी गरुड यांनी आपण शासनाचे सेवक आहोत  त्यामुळे कामात त्यामुळे कोणीही कामांमध्ये कुचराई न करता यापुढेही चांगल्या पद्धतीने काम करण्याची भूमिका एकमेकाच्या समन्वयाने घेऊन ज्या पद्धतीने हे उपविभागीय कार्यालय सर्वच बाबतीत पुढे आहे त्याच पद्धतीने यापुढे हे उपविभागीय कार्यालय सर्वच बाबतीत पुढे राहिल . अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.